

सांगली - शहरातील राम मंदिर चौकातील पंचमुखी मारूती रस्ता परिसर गोळीबाराने हादरला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या उर्फ प्रफुल्ल अरूण पोतदार (रा. सम्राट व्यायाम मंडळ, सांगली) याने गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. निलेश प्रमोद जाधव (२९, रा. हिराबाग कॉर्नर, सांगली) या जखमी झाला असून त्याचा पायात गोळी लागली आहे.