Siddharth Done Maharaj annual predictions 2026
esakal
कोगनोळी : निपाणी तालुक्यातील श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथे दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी (Halasiddhanath Yatra 2026 latest news) गुरुवारी (ता. २९) कर्नाटक, महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. “हालसिद्धनाथ महाराज की जय....” व “चांगभलं....”च्या जयघोषाने संपूर्ण यात्रास्थळ दुमदुमून गेले होते.