हणमंत निराणींच्या स्वीयसहायकाला डीसीनी झापले; विनाओळखपत्र केंद्रात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hanumant Nirani s personal-assistant Unknown ballot counting center nitesh patil vote counting belgaum

हणमंत निराणींच्या स्वीयसहायकाला डीसीनी झापले; विनाओळखपत्र केंद्रात दाखल

बेळगाव : विनाओळखपत्र मतमोजणी केंद्रात दाखल झालेल्या कर्नाटक वायव्य पदवीधर मतदार संघातील भाजप उमेदवार हणमंत निराणी यांच्या स्वीयसहायकाला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी झापले. तिथेच न थांबता केंद्रातून बाहेर हाकलून लावा, असे निर्देश दिले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. ज्योती कॉलेजमध्ये आज (ता १५) सकाळी 8 वाजल्यापासून विधान परिषद मतमोजपाणीला सुरुवात झाली. यावेळी उमेदवार, समर्थक आणि अधिकृत पास असलेले एजंट आत येण्यास सुरू झाले. पण दरम्यानच्या काळात आमदार हणमंत निराणी यांचे स्वीय सहाय्यक येथे पोचले. ओळखपत्र नसताना आत प्रवेश केला होता.

त्याची माहिती जिल्हाधिकारी पाटील यांना मिळताच स्वीय सहायक याला गाठले. त्याच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली. ओळखपत्र नसल्याचे दिसून आल्यानंतर त्याला चांगलेच धारेवर धरले. थातूर मातूर उत्तर आणि चढ आवाजात उत्तर देत असल्याचे लक्षात येताच डीसी पाटील यांनी " तुझा हात खाली घे", असे खडे बोल सुनावत पोलिस, सुरक्षारक्षकांना सूचना करून तेथून बाहेर हाकलून लावले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अधिकारी आणि पोलिसांची तारांबळ उडाली. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी या संदर्भातील व्हिडिओ टिपले. दरम्यान, विना ओळखपत्र व्यक्ती आत प्रवेश केल्याने हलगर्जीपणाचा विषय चर्चेचा ठरला.

Web Title: Hanumant Nirani S Personal Assistant Unknown Ballot Counting Center Nitesh Patil Vote Counting Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top