रेल्वेच्या आयआरसीटीसी ॲपवरून बुकिंगला अनेक जण प्राधान्य देतात. या ॲपमध्ये बेळगाव ते तिरुपतीदरम्यान ३१ डिसेंबर ते फेब्रुवारी १५ तारखेपर्यंत रेल्वेचे बुकिंग फुल्ल दाखवत आहे.
बेळगाव : बेळगाव ते तिरुपती दरम्यान धावणाऱ्या हरीप्रिया एक्स्प्रेसचे (Haripriya Express) सुमारे दीड ते दोन महिन्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. दोन महिन्यांनंतरचे तिकीट काढण्याची वेळ भाविकांवर आली आहे. मात्र, ६० दिवस अगोदरच बुकिंग झाले असल्याने अडचणीही वाढल्या आहेत. या दरम्यानची विमानसेवाही बंद झाल्यामुळे अनेक जण रेल्वेवरच अवलंबून आहेत. मात्र, रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.