esakal | 52 वर्षांपासून हजारो हार्मोनियम तयार करणारा कर्नाटकचा आर्टिस्ट दुर्लक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

 परशराम भुज गुरव

हजारो हार्मोनियम तयार करणारा कर्नाटकचा आर्टिस्ट दुर्लक्षित

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेता फक्त वाद्य दुरुस्तीतून हार्मोनियम बनवण्यात हातखंडा असलेल्या परशराम भुज गुरव या अवलियाने आतापर्यंत हजारो हार्मोनियम तयार केले आहेत. तसेच गेल्या ५२ वर्षांपासून ते संगीत सेवा करीत आहेत. मात्र आतापर्यंत एकदाही यांच्या कार्याची दखल सरकारने किंवा कोणत्याही संगीत क्षेत्रातील व्यक्तींनी घेतली नाही. याचे दुःख मात्र त्यांना आहे.

खानापूर तालुक्यातील खैरवाड गावातील परशराम भुज गुरव याना लहानपणापासून संगीताची आवडत होती. त्यामुळे आपसूकच ते या क्षेत्राकडे ओढले गेले. संगीत तंत्रज्ञानाची आवड असल्याने त्यांनी हार्मोनियम कसे तयार केले जाते याबाबतची माहिती जाणून घेतली व सुरवातीला वाद्यांची हातानेच दुरुस्ती करण्यास सुरवात केली. तसेच वयाच्या अवघ्या १६ वर्षी त्यांनी पहिले हार्मोनियम बनविले त्यानंतर भुज गुरव यांनी हजारो हार्मोनियम तयार केले आहेत. तसेच कोणत्याही यंत्राची मदत न घेता हार्मोनियम दुरुस्ती व तयार करण्यामध्ये त्यांच्या हातखंडा असून नवी कोरी हार्मोनिअम तयार करावी भुज गुरव यांनीच त्यामुळेच गोवा, सुपा, कारवार, हळीयाळ, खानापूर आदी भागातील लोक त्यांच्याकडे मोठ्या संख्येने हार्मोनियम तयार करून घेण्यासाठी येत असतात.

हार्मोनियम तयार करण्यासाठी नोंदणी केल्यानंतर काही दिवसात हार्मोनियम तयार करून दिले जाते भुज गुरव यांनी तयार केलेले हर्मोनियम उत्कृष्ट दर्जाचे असल्याने त्यांच्या कामाचे सर्वजण कौतुक करतात मात्र त्यांनी आतापर्यंत केलेल्या संगीत क्षेत्रातील कार्याची दखल कोणीही घेतली नाही. याचे मात्र ते दुःख बोलून दाखवतात. परंतु यापुढेही हार्मोनियम बनवण्याचे काम अखंडपणे सुरू राहील असा विश्वास ते व्यक्त करतात.

हेही वाचा: संगमेश्वरात सेनेला खिंडार; शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

हार्मोनियम तयार करण्याची कला लहानपणी अवगत केली. त्यानंतर आतापर्यंत पंचम व मध्यम स्वर टुनिंग करून हार्मोनियम तयार करतो. संगीत क्षेत्राची आतापर्यंत मनोभावे सेवा केली आहे तसेच यापुढेही करणार आहे.

परशराम भुज गुरव,बेळगाव

loading image
go to top