Pune Graduate Constituency : लेंगरेच्या निंबाळकरांची नात झाली आमदार! पुणे पदवीधरमधून माजी IAS अधिकाऱ्याच्या लेकीच्या अंगाला गुलाल, वाचा हर्षदा यांचा थक्क करणारा प्रवास

Harshada Deshmukh-Jadhav election victory : सोलापूरमध्ये जन्मलेल्या, कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या आणि सांगली-सातारा-पुण्याशी नाते असलेल्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवला.
Harshada Deshmukh-Jadhav election victory

Harshada Deshmukh-Jadhav election victory

esakal

Updated on: 

सांगली : आजोळ सांगली... मूळगाव सातारा...जन्म सोलापूरचा...शिक्षण कोल्हापुरात...तर सासर पुण्यात...असा प्रवास झालेल्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडला. पुणे पदवीधर मतदारसंघात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा झेंडा (Pune Graduate Constituency election result) फडकवला. जन्मल्यापासून पाच जिल्ह्यांशी विविध कारणांनी संबंध आलेल्या हर्षदा यांनी लक्षवेधी विजय नोंदवला. खानापूर तालुक्यातील लेंगरे गावच्या नाईक-निंबाळकर घराण्याची ही नात राज्याच्या विधिमंडळात आमदार म्हणून जात आहे.

Loading content, please wait...