esakal | पैसा, बंगला, कार आहे... पण, सध्या खायला काही नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

having money, bungalow, car... but, there's nothing to eat right now!

माझ्याकडे खूप पैसा आहे. बंगला आहे. आलिशान कार आहे. मला कोणता संसर्ग नाही. पण या क्षणाला खायला अन्न व पाणी मिळत नाही. अशी केविलवाणी स्थिती आहे. पुणे बंगळुरू महामार्गावरील फसलेल्या फिरस्तींची!

पैसा, बंगला, कार आहे... पण, सध्या खायला काही नाही!

sakal_logo
By
दीपक पवार

इटकरे : माझ्याकडे खूप पैसा आहे. बंगला आहे. आलिशान कार आहे. मला कोणता संसर्ग नाही. पण या क्षणाला खायला अन्न व पाणी मिळत नाही. अशी केविलवाणी स्थिती आहे. पुणे बंगळुरू महामार्गावरील फसलेल्या फिरस्तींची!

"कोरोना' च्या संकटांने शहरे, गावे, अन रस्तेही निर्मनुष्य झाले. कासेगाव ते किणी टोल नाक्‍या दरम्यान पोलिसांना विनवण्या करीत हुलकावणी देत बाहेरुन आलेले गरीब, श्रीमंत प्रवासी अडकलेत. काहींच्या पायाला चालून फोड आलेत. काही आलिशान गाडी मालक अन्नाची विचारणा करीत आहेत. मुला बाळाच्या ओढीनं बाप अन आई बापाच्या आठवणीने मुलांची पायपीट सुरू आहे. उच्चभ्र लोकांची पर्यटन, व्यवसायानिमित्त सफर मध्येच अडकली आहे. काहेंना पोलिसांचा मारही खावा लागला. 

सांगली जिल्ह्यातून गेलेले किणी टोल नाक्‍यावर अडकले. त्यांना प्रशासन कारवाई बरोबरच जेवणही देत आहे. तर कासेगाव, पेठ, कामेरी, इटकरे येथे कोरोना समिती सदस्य दिशाहीन पादचाऱ्यांना स्वतःची काळजी घेत मानवतावाद जपत जेवण देत आहेत. 

कुरळप पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. महामार्गावरील पादचाऱ्यांना दंडुका आहे. मानवतेतून पोलिस गाडीतील बिस्किट आणि पाणी साठाही भुकेल्यांसाठी देत आहेत.