The crime against 11 people, including the Sainik Bank Bank president
The crime against 11 people, including the Sainik Bank Bank president

सैनिक सहकारी बॅंक अध्यक्षांसह 11 जणांविरुद्ध गुन्हा 

पारनेर ः सैनिक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, मुख्य व्यवस्थापक संजय कोरडे यांच्यासह बॅंकेच्या 11 जणांवर 16 लाख 19 हजार 322 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या बॅंकेतच आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 

अशोक अंबादास वहीवर (रा. लोहगाव, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली. आरोपींनी 2004 ते 2011 या काळातील कर्ज प्रकरणात फिर्यादीची पुणे येथील 24.5 गुंठे जमीन व निघोज येथील 67 गुंठे जमीन तत्कालीन बाजारभावापेक्षा कमी किमतीची दाखवून व त्यानंतर मिळालेल्या 30 लाख रुपयांपैकी 14 लाख आठ हजार रुपये फिर्यादी व नामदेव शेळके यांच्या संमतीशिवाय कर्ज खात्यात जमा केली. जमिनीच्या बचत खात्यावर आलेल्या रकमेपैकी 16 लाख 19 हजार 322 रुपयांची रक्कम फिर्यादीची परवानगी नसताना परस्पर काढून घेऊन अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

अशी आहेत नावे

बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे (रा. कान्हूर पठार), व्यवस्थापक संजय कोरडे (रा. हिवरे कोरडा), दत्तात्रय भुजबळ (रा. रुईछत्तिशी), अनिल मापारी (रा. राळेगणसिद्धी), वसुली अधिकारी प्रवीण निघूट (रा. वडझिरे), लेखनिक अण्णा थोरात (रा. पिंपरी जलसेन), विशेष वसुली अधिकारी संतोष भनगडे (रा. भाळवणी), बबन फंड (रा. सारोळे अडवाई), रमेश मासाळ (रा. पारनेर), भरत पाचरणे (रा. पळवे खुर्द), राहुल वाबळे (रा. घाणेगाव) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 
 
बॅंकेला बदनाम करण्याचा कट ः व्यवहारे 
बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे याबाबत म्हणाले, ""फिर्यादी अशोक वहीवर यांचा आरोप निखालस खोटा आहे. या जमिनीची विक्री झाली, त्या वेळी मी बॅंकेचा अध्यक्षसुद्धा नव्हतो. केवळ मला व बॅंकेला बदनाम करण्याचा हा कट आहे. बॅंकेचा कारभार अतिशय चांगला सुरू आहे. कोणाचीही कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही. न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. त्या वेळी सत्य बाहेर येईल. आम्ही अशा खोट्या आरोपांना घाबरणार नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com