मुकुंदनगरमध्ये मुजोरी...इस इलाके के में दिखने का नही, आरोग्यसेविकांना केली धक्काबुक्की 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

जिल्ह्यात काल परदेशी दोन नागरिकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. ते मुकुंदनगर येथे वास्तव्यास होते व तेथून ते जामखेडला गेले होते, अशी माहिती पुढे आली. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ मुकुंदनगर येथे कोरोनाबाबत सर्वेक्षण सुरू केले. आरोग्यसेविका मुकुंदनगर येथील वाधवा कॉलनी, दरबार कॉलनी येथे फिरून सर्वेक्षण करीत होत्या. सकाळी साडेअकरा वाजता आरोपी तेथे आले.

नगर : कोरोना संसर्गाबाबत सर्वेक्षण करीत असलेल्या आरोग्यसेविकांना मुकुंदनगरमधील दरबार कॉलनी, वाधवा कॉलनीमध्ये नागरिकांनी धक्काबुक्की करीत नोंदवही हिसकावून घेतली. "पुन्हा येथे यायचे नाही,' अशी धमकीही दिली.

या प्रकरणी विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. सलीम अकबर (रा. नीट पार्क, मुकुंदनगर), रेहान रफिक शेख, रफिक इस्माईल शेख (रा. दरबार कॉलनी, मुकुंदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

जिल्ह्यात काल परदेशी दोन नागरिकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. ते मुकुंदनगर येथे वास्तव्यास होते व तेथून ते जामखेडला गेले होते, अशी माहिती पुढे आली. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ मुकुंदनगर येथे कोरोनाबाबत सर्वेक्षण सुरू केले. आरोग्यसेविका मुकुंदनगर येथील वाधवा कॉलनी, दरबार कॉलनी येथे फिरून सर्वेक्षण करीत होत्या. सकाळी साडेअकरा वाजता आरोपी तेथे आले.

आरोग्यसेविकांनी आरोपींची नावे नोंदवहीत लिहिण्यास सुरवात केल्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातील ओळखपत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि विनयभंग केला. आरोग्यसेविकांच्या हातातील नोंदवही हिसकावली. पुन्हा या परिसरात यायचे नाही, असा दमही दिला. 
मुकुंदनगरमध्ये एकाच वेळी तीन आरोग्यसेविकांना अशा प्रकारास सामोरे जावे लागले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आरोग्यसेविकांना संरक्षण दिले. याबाबत सरकारी कामात अडथळा आणि विनयभंग, असे तीन स्वतंत्र गुन्हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. 

मुकुंदनगरमधील परिस्थिती लक्षात घेता तेथे अकरा फिक्‍स पॉइंट देण्यात आले आहेत. तसेच, शीघ्रकृती दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलिस प्रशासन नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. 
- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक, नगर शहर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health workers are shocked at Mukundanagar