esakal | होय! माझं हृदय धडकतं उजव्या बाजूला; मला समजलं 37 व्या वर्षी I Heart
sakal

बोलून बातमी शोधा

Heart attack

२०११ मध्ये छातीत दुखू लागल्याने कार्डिओलॉजिस्टकडे वैद्यकीय उपचारासाठी गेल्या. तेथे डॉक्टरांनी इसीजीबाबत सल्ला दिला.

होय! माझं हृदय धडकतं उजव्या बाजूला; मला समजलं 37 व्या वर्षी

sakal_logo
By
महेश काशिद

बेळगाव : देशातील ३० जणांचे ह्रदय उजव्या बाजूला असल्याचा शोध बेळगावच्या सविता चौगुले यांनी घेतला आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी म्हणजे २०११ मध्ये सविता यांना एका वैद्यकीय चाचणीत स्वतःचे ह्रदय उजव्या बाजूला असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी अशा व्यक्तींचा शोध घेण्यास सुरु केले. आतापर्यंत त्यांना ३० जणांचे ह्रदय हे उजव्या बाजूला असल्याचे आढळून आले आहे. यात ३ महिला, २७ पुरुषांचा समावेश आहे. २७ पैकी २ अल्पवयीन मुले आहेत. जिल्ह्यात महिलेसह आणखी एकाला उजव्या बाजूला ह्रदय आहे.

बहुतेक मनुष्याचे हृदय डाव्या बाजूला असते. पण, बेळगावातील सविता यांना २०११ मध्ये हृदय उजव्या बाजूला असल्याचे निदान झाले. सविता या मुळच्या म्हैसूरजवळील चामराजनगरच्या. प्राथमिक, पदवीपूर्व व पदवी (बी. एस्सी) शिक्षण चामराजनगरला झाले. बेळगावमधील ॲड. सुनील चौगुले यांच्याशी त्यांचा विवाह १९९४ मध्ये झाला. पण, ३७ व्या वर्षापर्यंत त्यांना हृदय उजव्या बाजूला असल्याबाबत कल्पना नव्हती.

२०११ मध्ये छातीत दुखू लागल्याने कार्डिओलॉजिस्टकडे वैद्यकीय उपचारासाठी गेल्या. तेथे डॉक्टरांनी इसीजीबाबत सल्ला दिला. यावेळी त्यांना हृदय उजव्या बाजूला असल्याचे कळले. सुरवातीला सविता यांना धक्का बसला. परंतु, नंतर त्यांनी याबाबत अभ्यास सुरु केला. जगात आणि देशात अशा किती व्यक्ती आहेत, याची माहिती संकलन सुरु केले. यानुसार आतापर्यंत ३० जणांचा शोध घेतला. हे हृदयही काम सुरळीत करते. लाखात अशी एक व्यक्ती असते.

हेही वाचा: केंद्राच्या मदतीनं परमबीर सिंह यांना शोधत आहोत: वळसे पाटील

"उजव्या बाजूला ह्रदय असल्याची माहिती कळल्यानंतर सुरवातीला अस्वस्थता होती. त्यानंतर यास्वरुपाची देशात आणि जगात आणखी किती व्यक्ती आहेत, हे जाणून घेण्यासाठी शोध सुरु केला. प्रवासात दक्षिण भारत, उत्तर भारत, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकत्ता, पंजाब, केरळ, बेळगाव जिल्ह्यात माझ्यासह आणखी व्यक्ती आहेत. अशी शरीररचना असलेल्या व्यक्तींचा शोध सोशल मिडियाच्या आधारे घेण्याचा प्रयत्न करत आहे."

- सविता चौगुले

लाखात एका व्यक्तीचे हृदय उजव्या बाजूला असते. शरीराचे हे फक्त वेगळेपण आहे. त्याचा शरीरावर कोणताही परिणाम जाणवत नाही. यामुळे एखाद्यावेळी वैद्यकीय चाचणीत हृदय उजव्या बाजूला असल्याचे आढळून आल्यास घाबरण्याची गरज नाही. या स्वरुपाच्या व्यक्तींवर उपचार करताना डॉक्टरांनी काळजी घेणे जरुरी असते. वैद्यकीय उपचारपूर्वी त्यांना व्यक्तीचे हृदय उजव्याबाजूला आहे, याची माहिती देण्याची गरज आहे.

- डॉ. प्रा. महांतेश बी. रामण्णावर, केएलई बीएमके आयुर्वेदिक महाविद्यालय

हेही वाचा: CSK vs SRH Live: साहाचं अर्धशतक हुकलं; हैदराबाद संकटात

अशी घ्यावी खबरदारी

हातावर टॅटो, किंवा हॅण्ड बॅण्डद्वारे उजव्या बाजूला हृदय असल्याची कल्पना द्यावी. यामुळे एखाद्यावेळी अपघात किंवा अत्यवस्थ झाल्यानंतर या संकेताच्या आधारे डॉक्टरांना वैद्यकीय उपचार देण्यास मदत मिळू शकते. शिवाय ह्रदयाचे ठोके तपासताना सामान्यपणे डॉक्टर मनुष्याच्या डाव्या बाजूला स्टेथसस्कोप ठेवतात. पण, उजव्याबाजूला हृदय असणाऱ्यांसाठी उजव्या बाजूला तपासणी करावी लागले. तसेच एखादी शस्त्रक्रिया किंवा अन्य वैद्यकीय उपचार घेतानाही डॉक्टरांना याची कल्पना देणे गरजेचे ठरते.

loading image
go to top