भिलवडी परिसरात मुसळधार पाऊस

सतिश तोडकर
Monday, 7 September 2020

भिलवडी : परिसरात काल रात्री झालेल्या धुवाधार पावसाने शेतशिवारास तळयाचे स्वरूप आले. येथे रात्री अवघ्या सहा तासात तब्बल 112 मि.मी. इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हा मोठा पाऊस होता. 

भिलवडी :सांगली,  परिसरात काल रात्री झालेल्या धुवाधार पावसाने शेतशिवारास तळयाचे स्वरूप आले. येथे रात्री अवघ्या सहा तासात तब्बल 112 मि.मी. इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हा मोठा पाऊस होता. 

रविवारी दिवसभर हवेत उष्मा होता. सायंकाळी ढगांची गर्दी व वीज होऊ लागली. रात्री आठ वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे सहा- सात तास पहाटेपर्यंत दमदार पाऊस झाला. या पावसाचे थेंबही मोठे होते. या पावसाने शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी वाहु लागले.

व्हंडी , मौटी , लव्हाळकी , भटकी भागातील ओढे नाले तुडुंब भरून वाहु लागले. वसगडे दरम्यानचा कृष्णा कालवा अनेक ठिकाणी फुटुन पाणी रस्त्यावरून वाहत होतेयेथील सेकंडरी स्कूृलमध्ये शास्त्र प्रयोगशाळेत 1964 पासुन दैनंदिन पाऊस व तापमानाची स्वतंत्रपणे नोंद ठेवली जाते.

पावसाबरोबर कमाल, किमान तापमान, बॅरोमीटरद्वारे हवेचा दाब मोजला जातो. दररोज सकाळी चोवीस तासातील पर्जन्यमान पाहिले जाते. शाळेच्या फलकावर त्याबाबत माहिती लिहिली जाते. यंदा उशिरा पावसाची सुरु झाली. परिसरात मे महिण्यात आगाप खरीप सोयाबीनची लागवड होते. सुमारे सत्तर टक्के क्षेत्रातील पिकाची कापणी मळणी झाली आहे.

जुन - जुलैच्या आडसाली ऊस लागणी, केळी, भुईमुग पिकांमध्ये पाणी उभे राहिले आहे. ठिकठिकाणी बांघ, ताली फुटुन पाणी वाहत आहे. गेल्या चार दिवसापासुन हवेत मोठा उष्मा होता . ऊनही कडक पडत होते . आठवडाभरात अधुनमधुन पावसाच्या मोठया सरी येत होत्या , त्याने उकाड्यात आणखी भर पडत होती. 

 
54 वर्षानंतर मोठा पाऊस 
येथील शाळेतील 56 वर्षातील नोंदीमध्ये यापुर्वी चोवीस तासात 13 जुन 1966 रोजी 115 मि.मी. तर 2019 मध्ये वार्षिक 861 मि.मी. इतका विक्रमी पाऊस पडला आहे . कालचा पाऊस 54 वर्षानंतरचा मोठा नोंदवला गेला . 

संपादन ः अमोल गुरव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Bhilwadi area