esakal | सांगली जिल्ह्यात रविवारी दीड तासात अतिवृष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

सांगली जिल्ह्यात रविवारी दीड तासात अतिवृष्टी

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : सांगली, मिरज शहरांना रविवारी सायंकाळी पावसाने झोडपले. सांगली शहरात दीड तासात कालावधीत १०१ मिलिमिटर म्हणजे अतिवृष्टी झाली. सन २००५ नंतर सांगलीत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाने शहरात हाहाकार माजला. चौक, रस्ते, विस्तारित भागात पाणीच पाणी झाले. उपनगरांतील अनेक घरांमध्ये, झोपडपट्टीत पाणी शिरले. गटारी तुंबून घरांत शिरल्या.

रविवारी सायंकाळी सांगली शहरात पाचला तशी ढगफुटी म्हणावी असा पाऊस झाला. सांगली, मिरज वगळता जिल्ह्यात पाऊस कमी झाला. अर्धा तासात २५ ते ३० मिलिमिटर, तासात ६० तर दीड तासात ९० मिलिमिटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर अश्‍या ठिकाणी ढगफुटीसारखी परस्थिती निर्माण होते. सांगली शहरात रविवारच्या दीड तासात ही परस्थिती ओढवली. तासापेक्षा अधिक काळ एकसारखा पाऊस कोसळला. तासानी थोडा कमी झाला. शहरातील अनेकांच्या घरांत पाणी शिरले. मारुती चौक पाण्यात बुडाला. गुंठेवारी भागात तासाभरात महापुरासारखी स्थिती निर्माण झाली. शहरातील बहुतांश चौकांत पाणी साचले. वाहतूक खोळंबली.

गेल्या २४ तासात व जुनपासून आजअखेर झालेला पाऊस मिलिमिटरमध्ये असा- सांगली- १०१ व ६८९, मिरज- ६१ व ६५७, तासगाव- ६ व ५०२, पलूस- १३ व ५२३, शिराळा- ०.३ व ६६८, विटा- ० व ३७८, आटपाडी- ०.३ व ४९१, कवठेमहांकाळ- ०० व ४२३, जत- ०० व ६१२, कडेगाव-२.५ व ४५०.

loading image
go to top