
सांगली : जिल्ह्याच्या बहुतांश भागात आजही पाऊस सुरूच होता. सकाळपासून दुपारी साडेबारा आणि सायंकाळी साडेचार ते रात्रीपर्यंत पाऊस सुरूच होता. दुपारी काहीकाळ पावसाने उघडीप दिली होती. दरम्यान, गेले दहा दिवस पाऊस सुरू असल्यामुळे ओढे, नाल्यांतून पाणी वाहत आहे. शेतीचे बांध पाण्याने भरले आहेत. सांगलीतील कृष्णा नदीवरील बंधारा शनिवारी पाण्याखाली गेला. मे महिन्यात पहिल्यांदाच बंधारा पाण्याखाली गेला आहे.