
Sangli Shirala Rain : शिरशी (ता. शिराळा) येथे गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पेरणी केलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. स्मशानभूमी जवळील रस्ता खचला असून छोटा बंधारा फुटला आहे. कासेगाव-येळापूर दरम्यानच्या रायगड(महिंदवाडी)लगत असणाऱ्या पुलाजवळील संरक्षण कठड्याचा भराव वाहून गेला. त्या लगत असणाऱ्या दोन विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.