
Sangli Weather Update : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी सांडवा पातळीच्या वरती आल्यानंतर जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून येत्या २४ तासात वक्र द्वाराद्वारे २८४० क्युसेक पर्यंत व विद्युतगृह १६६० क्युसेक असा एकूण ४५०० क्युसेक पर्यंत विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.