चिंचोलीच्या फडात  रानडुकरांचा धुमाकूळ 

नारायाण घोडे 
Saturday, 11 July 2020

कोकरूड (सांगली) ः चिंचोली (ता. शिराळा) येथील गावाच्या दक्षिण बाजूच्या टेकाच्या परिसरात डोंगराच्या दिशेने येणाऱ्या रानडुकरांच्या कळपाने ऊसाच्या फडात धुमाकूळ घातला असून ऊस पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

कोकरूड (सांगली) ः चिंचोली (ता. शिराळा) येथील गावाच्या दक्षिण बाजूच्या टेकाच्या परिसरात डोंगराच्या दिशेने येणाऱ्या रानडुकरांच्या कळपाने ऊसाच्या फडात धुमाकूळ घातला असून ऊस पिकांचे मोठे नुकसान केले आहे. 
त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

चिंचोली येथील टेकाचा माळ परिसरात शुक्रवारी मध्यरात्री डुकराच्या कळपाने सुमारे दीड एकरांतील खरीप हंगामातील उभा असलेली लागण ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांनी या हंगामात ऊसाचे बेणे विकत आणून उसाची लागवड केली होती.

शेतकऱ्याला हुकमी चार पैसे मिळवून देणाऱ्या ऊसपिकाचेच नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गावाच्या पूर्व बाजूकडील डोंगरराकडून रात्रीत डुकराचे कळप शिवारात येऊन उभ्या ऊस पिकाचे नुकसान करत आहेत.

शेतकऱ्यांनी जोमात आलेली पिके त्यांचाच डोळ्यासमोर रानडुकराकडून भुई सपाट होताना पहावे लागत आहे. शेतकरी रामचंद्र भाऊ जाधव,वसंत रामचंद्र जाधव,शंकर महादेव जाधव यांच्या ऊस पिकाचे रानडुकराने नुकसान केले आहे.शिवारात रानडुकराच्या मोकाट वावरामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे 

संपादन ः अमोल गुरव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A herd of cows in Chincholi

Tags
टॉपिकस
Topic Tags: