Heroin Drug
Heroin Drugsakal

बेळगाव मध्ये हेरॉइन जप्त; दोघांना अटक

छापा टाकून कारवाई करण्यात आली.
Published on

बेळगाव : हेरॉईन अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अबकारी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. वंटरमुरीनजीक एका मोटारीत हेरॉइनची विक्री करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती अबकारी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून कारवाई करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून १६ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. या प्रकरणी अब्दुल खादिर अतिक नायक उर्फ झिया आणि एकीब सलीम मकानदार या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com