esakal | जत सीमा भागात हायअलर्ट 
sakal

बोलून बातमी शोधा

 Hi alert in Jat border area

जत हा सीमावर्ती कर्नाटक राज्यालगतचा तालुका असल्याने व या तालुक्‍यातील बहुतांशी लोकांची नाळ ही कर्नाटक राज्याशी जोडली गेलेली असल्याने, तालुक्‍यातील जत पूर्व व जत दक्षिण हा भाग कोरोनाच्या बाबतीत संवेदनशील बनला आहे. 

जत सीमा भागात हायअलर्ट 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

संख ः जत (जि सांगली) तालुक्‍याच्या लगत असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर व बेळगाव या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून जत तालुक्‍यातील जनतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. तालुका हा सीमावर्ती कर्नाटक राज्यालगतचा तालुका असल्याने व या तालुक्‍यातील बहुतांशी लोकांची नाळ ही कर्नाटक राज्याशी जोडली गेलेली असल्याने तालुक्‍यातील जत पूर्व व जत दक्षिण हा भाग कोरोनाच्या बाबतीत संवेदनशील बनला आहे. 

विजयपूर जिल्ह्यातील छप्परगंज विभागातील एका महिलेला प्रथम कोरोना या महामारी ची बाधा झालेली आढळून आली. त्यानंतर अल्पावधीतच या महिलेच्या संपर्कात आलेल्या आणखी सोळा जणांना या कोरोनारूपी महामारी ची बाधा झालेली दिसून आली. आतापर्यंत जत तालुक्‍याच्या लगतच्या सीमावर्ती कर्नाटक राज्यातील विजयपूर तालुक्‍यात सतरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

अशीच परिस्थिती जत तालुक्‍यातील सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात दिसून येत आहे. बेळगाव जिल्ह्यात ही कोरोना या महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. जत तालुक्‍यातील बहुतांशी व्यापारी हे कर्नाटक राज्यातील विजयपूर येथून व बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्‍यातून दुकानासाठी लागणारे किराणा माल व इतर प्रकारचा माल खरेदी करतात.

त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील लोक व्यापारासाठी व वैद्यकीय उपचारासाठी जत तालुक्‍यात येत आहेत. कोरोना या विषाणू जन्य रोगाने जगव्याप्त केले आहे. जगातील दोनशेहून अधिक देशांमध्ये कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. जगात वीस लाखांहून अधिक जण या कोरोनारूपी महामारीने बाधित आहेत. तर पाच लाखांच्या जवळपास लोक या महामारीतून बरे झाले आहेत. तर दीडलाखाहून जवळपास लोक या कोरोना रोगाने बळी पडले आहेत.