esakal | बेळगाव विमानतळावर कोरोनाची धास्ती
sakal

बोलून बातमी शोधा

high alert, belgaum, airport, corona virus

सांबरा विमानतळ देशांतर्गत विमानोड्डाण करणाऱ्या विमानांसाठी जरी असले तरी अनेक विदेशी पर्यटक देखील विमानमार्गे बेळगावात दाखल होतात. त्यातच दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, केरळ आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने बेळगावातही आरोग्य खात्याचा हाय अलर्ट आहे.

बेळगाव विमानतळावर कोरोनाची धास्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांबराः देशात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने बेळगावात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची देखील सांबरा विमानतळावर आरोग्य तपासणी हाती घेण्यात आली आहे. आजपासून (ता. 6) विमानतळावर जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून एक डॉक्‍टर आणि दोन आरोग्य सहायकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी प्रवाशांची तपासणी करून नंतरच त्यांना बेळगावात प्रवेश दिला आहे. 

हे पण वाचा - अर्थसंकल्प २०२० : अर्थसंकल्पात कोकणाला काय मिळाले ? वाचा....

सांबरा विमानतळ देशांतर्गत विमानोड्डाण करणाऱ्या विमानांसाठी जरी असले तरी अनेक विदेशी पर्यटक देखील विमानमार्गे बेळगावात दाखल होतात. त्यातच दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, केरळ आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने बेळगावातही आरोग्य खात्याचा हाय अलर्ट आहे. आरोग्य खात्याने त्यासाठी आजपासून एक डॉक्‍टर आणि दोन आरोग्य सेवक नियुक्त करण्यात आहेत. सध्या सांबरा विमानतळावरून स्पाइस जेट, इंडीगो, अलायन्स एअर, स्टार एअर, ट्रुजेट या चार विमान कंपन्यांकडून बंगळूर, पुणे, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, इंदोर, कडप्पा, म्हैसूर आणि तिरुपतीला सेवा दिली जात आहे. यापैकी बंगळूर, हैदराबाद येथे यापूर्वीच कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 

हे पण वाचा - कोल्हापूर विमानतळावर कोरोना वायरस प्रतिबंधात्मक उपाय योजना... 

तर सांबरा विमानतळावरून बंगळूर, मुंबई आणि हैदराबाद या तीन ठिकाणी प्रवासी मोठ्या प्रमांणात ये-जा करतात. मुंबई, पुणे, बंगळूर आणि हैदराबादसाठी बेळगाव हा सेंटर पॉईंट आहे. त्यामुळे, बेळगावातही याबाबत दक्षता घेतली जात आहे. जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र विभागाची व्यवस्था केली आहे. सांबरा विमानतळावर यापूर्वीच कोरोना विषयीचे जागृती फलक बसविण्यात आले होते. तर विमानतळावरील कर्मचारीही मास्कचा वापर करू लागले आहेत. त्यातच आता विमानतळावर आरोग्य तपासणी केली जात असून कोरोनाविषयी अधिक खबरदारी घेतली जात आहे.