बेळगाव : तिनईकर हल्ला प्रकरणांत ७ जणांना जामीन

उच्च न्यायालय; झाडशहापूरला हल्ला प्रकरण
High court grants bail to 7 Jayant Tinaikar case belgaum
High court grants bail to 7 Jayant Tinaikar case belgaum sakal
Updated on

बेळगाव : माहिती हक्क कार्यकर्ते जयंत तिनईकर हल्ला प्रकरणात आणखी ७ जणांना उच्च न्यायालयात नुकताच जामीन मंजूर झाला आहे. ४ मार्च रोजी झाडशहापूरजवळ श्री तिनईकर यांच्यावर हल्ल्याची घटना घडली आहे. या प्रकरणांत प्रमुख संशयिताला यापूर्वी जामीन मिळाला आहे. याबाबत माहिती अशी की, खानापूर येथील श्री तिनईकर ४ मार्च रोजी बेळगावहून खानापूरकडे कारने जात होते. झाडशहापूरजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांचे अडविले. त्याठिकाणी तिनईकर यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याविरोधामध्ये त्यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

संशयितांनी सुरवातीला जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. तेथे जामीन फेटाळला. यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याठिकाणी न्यायमुर्तींनी ७ जणांना ११ एप्रिलला जामीन केला आहे. यल्लाप्पा रामाप्पा गुजनाळ, भरमा कल्लाप्पा दयानट्टी, सुनील गोविंद दिवटगी, सचिन प्रभू यरझर्वी, ईश्‍वर महादेव हुबळी, मंजुनाथ सोमशेखर होसमनी आणि अखिलेश अंबिकाप्रसाद यादव अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. प्रकरणांतील प्रमुख आरोपी लक्ष्मण शेट्टी (वय ५५, रा रुमेवाडी क्रॉस) याला यापूर्वी म्हणजे ७ एप्रिलला जामीन मिळाला आहे. तर आज ७ जणांना जामीन मंजूर झाला आहे. यामुळे एकूण ८ जणांना आतापर्यंत जामीन मंजूर झाला आहे. संशयित आरोपींतर्फे अॅड. अशोक कल्याणशेट्टी, अॅड. व्ही. के. कळ्ळीमनी यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com