

Atpadi market witnesses surge in pomegranate prices as rainfall impacts production and boosts demand.
Sakal
आटपाडी : मे महिन्यात हंगाम धरलेल्या बागेच्या डाळिंबाचे सौदे व्यवहार सुरू झाले आहेत. मे महिन्यातील पावसामुळे उत्पादन कमी झाल्याने दर तेजीत आहेत. दर्जेदार डाळिंबाचे व्यवहार १३० ते १५५ रुपये किलो या दरम्यान सुरू आहेत. पुणे बाजारपेठेत भाव १३० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. स्थानिक आटपाडी बाजार समितीच्या लिलावात १०० ते १३५ रुपयांपर्यंत दर आहेत. आवक कमी असल्याने दर चांगलेच तेजीत आहेत.