Visapur Village History : नेतृत्व अन् कर्तृत्व निर्माण करणारे 'विसापूर'; काय आहे गावाची खासियत?

विसापूर परिसर आरफळ, ताकारी आणि टेंभू योजनेच्या (Takari and Tembhu Scheme) पाण्यामुळे सुजलाम् सुफलाम् होऊ लागलाय.
History of Visapur Village
History of Visapur Villageesakal
Summary

गावचे क्षेत्र ३४४६ हेक्टर क्षेत्र आहे. सन १९२४ मध्ये फाळणी झाली मात्र फाळणी बाराची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे सातबारा वहिवाट व नकाशामध्ये तफावत आहे.

विसापूर : पिढ्या न् पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणारा विसापूर परिसर आरफळ, ताकारी आणि टेंभू योजनेच्या (Takari and Tembhu Scheme) पाण्यामुळे सुजलाम् सुफलाम् होऊ लागलाय. पाण्यामुळे स्थैर्य व आर्थिक सुबत्ता आल्याने गावातही बदलाचे वारे वाहू लागलेत. शेतीसह गलाई व्यवसाय, राजकीय नेतृत्व, शिक्षकांची प्रचंड संख्या व सरकारी अधिकारी निर्माण करणारे गाव अशी वेगळी ओळख आहे. गावात बदलाचे वारे वाहताना मात्र काही विकास कामांना फटकाही बसला आहे.

रोजगार हमीचे जनक वि. स. पागे यांनी हमीच्या कामाचा प्रारंभ येथे केला. ही योजना संपूर्ण देशात राबविण्यात आली. या योजनेमुळे नालाबांध, छोटे बंधारे, तलाव तयार झाले. पाणी साठवण क्षमता वाढली. ताकारी, टेंभू योजना सुरू झाल्या. आरफळ योजना सुरू करणे गरजेचे असल्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील (R. R. Patil) यांनी जाणले. ‘आरफळ’मुळे विसापूरचा विकास गतीने सुरू झाला. द्राक्षबागा, उसासह अन्य नगदी पिके बहरू लागली. शेतकऱ्यांकडे पैसा आला. अत्याधुनिक शेती अवजारांसह दुचाकी-चारचाकी वाहने वाढली.

History of Visapur Village
Navekhed Village : वाळवा तालुक्यातील नवेखेड गावाने जिद्द, कष्टाने केला अनोखा प्रवास; काय आहे खासियत?

कार्पोरेट लूकच्या इमारती झाल्या. पक्के व काँक्रीटचे रस्ते झाले. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांचे रुपडे पालटले. रा. शा. माने-पाटील विद्यालयाची उत्तुंग इमारत झाली. शैक्षणिक गुणवत्ताही वाढली. देवळे स्वच्छ, नीटनेटकी दिसू लागली. शामराज महाराज मंदिर व परिसर रमणीय झाला. चौकाचौकांत पाण्याची एटीएम व फिल्टर आले. मात्र बँकेचं एटीएम नाही. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी येथे शैक्षणिक गुणवत्तेचे बीज रोवले. वेगवेगळ्या विभागांत विद्यार्थी चमकू लागले. मोठी पदे तरुणांना खुणावू लागली.

History of Visapur Village
राजू शेट्टींचं टेन्शन वाढवणारी बातमी! हातकणंगलेबाबत जयंत पाटलांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, तर आम्हालाही..

पोलिस आयुक्त, प्राप्तिकर आयुक्त, तहसीलदार, विक्री कर उपायुक्त, पोलिस अधिकारी, तसेच अन्य पदावर येथील रहिवासी आहेत. मात्र स्पर्धा परीक्षा केंद्र वा वाचनालय नाही, ही खंत आहे. त्यावर चर्चा व कृती व्हावी, अशी अपेक्षा आहे. पूर्वी गावात असलेले ग्रामीण रुग्णालय, एसएससी बोर्ड, सिटी सर्व्हे, महावितरण, प्राथमिक आरोग्य केंद्र अशी महत्त्वाची कार्यालये अन्य गावांना गेली. बारा हजार लोकसंख्येच्या गावाला बस स्थानक नाही.

जिल्हा मध्यवर्ती बँकेला स्वच्छतागृह नाही, ही शोकांतिका आहे. ज्येष्ठ नेते शंकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील, अर्जुन पाटील, माजी सभापती पतंग माने, माजी सरपंच बळवंत चव्हाण हे राजकारणातील धुरंधर, मुत्सद्दी. मात्र महत्त्वाची कार्यालये अन्य गावांना का गेली, याचे कारण ग्रामस्थांना अद्याप उमगलेले नाही.

History of Visapur Village
'शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा अदानी ग्रुपचा वीज प्रकल्‍प रद्द करा'; प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

‘रयत’च्या मानसपुत्राची गावासाठी चिरंतन मदत

विसापूरचे सुपुत्र व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी येथील कै. रा. शा. माने-पाटील विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी कोट्यवधींचा निधी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध केला. त्यांना गावकऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे सुसज्ज व उत्तुंग इमारत उभी राहिली आहे. त्यांचे हे काम गावासाठी चिरंतन आहे. बदलत्या गावाकरिता डॉ. एन. डी. पाटील यांचे मानसपुत्र डॉ. शिवणकर यांनी मोठे योगदान दिले आहे.

चळवळ जगणारे जगदाळे कुटुंबिय

स्वातंत्र्यसैनिक दिवंगत पांडुरंग जगदाळे हे कट्टर डाव्या विचारसरणीचे. त्यांच्या मुलांनी एक पाऊल पुढे टाकत हा विचार कृती आणला, पुढे नेला. इंदिराताई ग्रामपंचायत सदस्य असताना दारूबंदीसाठी आवाज उठवला. सोयरीक असो अथवा अन्य काही, या कुटुंबाने जातिधर्माला मूठमाती दिली आहे. अशोक, प्रकाश, डॉ. उदय, प्रताप, डॉ. राजेंद्र, डॉ. संदेश, दीपावली या भावंडांनी त्यासाठी धाडसी पावले उचलली. हा वारसा पाझरत दुसऱ्या पिढीतही रूजला आहे.

History of Visapur Village
शिवसेनेची मतदारसंघावरील पकड ढिली? शिंदे गटाच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नाव नसल्याची चर्चा, भाजपच्या वाट्याला जागा

शेतांच्या ‘फाळणीबारा’चा तिढा

गावचे क्षेत्र ३४४६ हेक्टर क्षेत्र आहे. सन १९२४ मध्ये फाळणी झाली मात्र फाळणी बाराची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे सातबारा वहिवाट व नकाशामध्ये तफावत आहे. ४०० पैकी अंदाजे ६० गटातील जमिनीचा फाळणी बारा झाला आहे. उर्वरित भुमापनाचा प्रश्न भिजत आहे. सन २००५ व २०१० मध्ये इतर गावचे तलाठी घेऊन काम सुरू झाले. मात्र वाद सुरू झाले. खटले दाखल होऊ लागले. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन अधिकारी पाठवले. त्यांनी काय निर्णय दिला याबाबत लोक अनभिज्ञ आहेत. वहिवाटप्रमाणे सातबारा नसल्याने जमीन गेलेल्यांना मोबदला मिळाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com