दोन वर्षानंतर होळीच्या साहित्याला मागणी वाढली, यावेळी कोणतेही निर्बंध नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi

होळीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुळे पांगुळ गल्ली आणि इतर भागातील बाजारपेठ विविध प्रकारचे रंग, पिचकारी, मुखवटे व इतर प्रकारच्या साहित्याने सजली आहे.

दोन वर्षानंतर होळीच्या साहित्याला मागणी वाढली, यावेळी कोणतेही निर्बंध नाहीत

बेळगाव - कोरोनाच्या (Corona) संकटामुळे गेली दोन वर्षे होळीच्या (Holi) उत्सवावर निर्बंध (Restrictions) होते त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका सहन करावा लागला होता. मात्र यावेळी निर्बंध नसल्यामुळे होळी सणाची तयारी आतापासूनच सुरू झाली असून ग्राहकांकडून होळीच्या साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. तसेच रंगपंचमी दिवशी शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

होळीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुळे पांगुळ गल्ली आणि इतर भागातील बाजारपेठ विविध प्रकारचे रंग, पिचकारी, मुखवटे व इतर प्रकारच्या साहित्याने सजली आहे. २०२० व २१ मध्ये कोरोनाचे संकट कायम असल्याने होळीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या व्यापारी वर्गाला चांगलाच फटका सहन करावा लागला होता. तसेच रंग व इतर साहित्याची खरेदी ही कमी प्रमाणात झाली होती मात्र यावेळी कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने सणावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. त्यामुळे यावेळी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार हे निश्चित आहे त्यामुळेच व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य आज उपलब्ध करून दिले आहे.

होळीमध्ये बालचमू, पिचकारी व इतर प्रकारचे साहित्य अधिक प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे बालचमुना आकर्षित करील असे साहित्य बाजारात अधिक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत रंगा सहा इतर साहित्याच्या दरात ५ टक्‍यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती व्यापारी वर्गातून दिली जात आहे. तसेच यावेळी बाजारपेठेत देशी साहित्य अधिक प्रमाणात उपलब्ध असून चायना मार्केट मधून येणाऱ्या साहित्याकडे ग्राहक पाठ फिरवित असल्याने यावर्षी देशात तयार झालेले साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हेही वाचा: कागल : अज्ञात वाहनाच्या धडकेत केनवडे येथील चुलते -पुतणे जागीच ठार

रंगपंचमी दिवशी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र दोन वर्षे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते मात्र यावर्षी पुन्हा एकदा ठीक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून रंगपंचमी दिवशी शहरात मोठा उत्साह पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. १७) रोजी होलिका दहन तर शुक्रवारी (ता. १८) रोजी धुली वंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. शहराच्या काही भागात पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते.

प्रतिक्रिया

होळीसाठी नवनवीन साहित्य उपलब्ध झाले असून दोन वर्षे साहित्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र येणाऱ्या चार दिवसात चांगल्या प्रमाणात खरेदी होईल अशी अपेक्षा आहे. दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

- विकी मेहता, व्यापारी

Web Title: Holi Equipment Demand Increase After Two Years No Restrictions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..