esakal | नाशिक ,विरारमधील घटनेनंतर सांगली-मिरज रुग्णालयाला राज्यमंत्र्यांनी दिला आदेश

बोलून बातमी शोधा

null

नाशिक, विरारमधील घटनेनंतर सांगली-मिरज रुग्णालयाला राज्यमंत्र्यांनी दिला आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: नाशिक आणि विरारमधील हॉस्पिटलमधील मृत्यूच्या तांडवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांच्या फायर ऑडीट पुढील 24 तासात करा असे आदेश राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी व आयुक्त नितिन कापडणीस यांना दिले. मंत्री कदम यांनी आज पहाटे विरारमधील घटना समजताच तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. महापालिका क्षेत्रातील सर्व कोविड रुग्णालयांचे प्राधान्याने ऑडीट करा असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- सांगली-कोल्हापूर प्रवेशबंदी; किणी टोलनाक्यावर कडक अंमलबजावणी

कदम म्हणाले,"नाशिकमधील ऑक्‍सिजन गळती आणि विरारमधील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील एसीतील बिघाडामुळे लागलेली आग दुर्दैवी घटना आहेत. आरोग्य यंत्रणावर ताण आहे मात्र अशा घटना टाळल्याच पाहिजेत. त्यातून धडा घेत सर्वच यंत्रणांनी आपल्यातील त्रुटी दूर करून स्वतःला सज्ज केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही घटनांच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. आज मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सांगली-मिरजेतील रुग्णालयांची माहिती घेतली. तेथील फायर ऑडीट करावे. पुढील 24 तासात त्याचा अहवाल द्यावा असे आदेश दिले आहेत.''

Edited By- Archana Banage