esakal | सांगली-कोल्हापूर प्रवेशबंदी; किणी टोलनाक्यावर कडक अंमलबजावणी

बोलून बातमी शोधा

null

सांगली-कोल्हापूर प्रवेशबंदी; किणी टोलनाक्यावर कडक अंमलबजावणी

sakal_logo
By
संजय पाटील

घुणकी (कोल्हापूर) : सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांना जिल्हा प्रवेश बंदीची कडक अंमलबजावणी किणी पथकर नाक्यावर सुरु आहे. मात्र घुणकीमार्गे वाहनांना जाता येत असल्याचे चित्र आहे. येथील पुणे-बंगळूर महामार्गावरील वारणा नदी ही कोल्हापूर-सांगली जिल्ह्याची हद्द आहे. सांगली जिल्ह्यातील कणेगांव येथे पोलिसांनी बरेकेट्स लावले आहेत.

हेही वाचा: सांगलीत वीस चित्रपटगृहांना टाळे; केवळ दहाच तग धरून

वारणा नदीनंतर घुणकी हे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले गाव असून या गावातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करता येतो. किणी (ता. हातकणंगले) येथील पथकर नाक्यावर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यासह चार अधिकारी, २४ कर्मचारी यांचा बंदोबस्त रात्रंदिवस सुरु राहणार आहे. यापुढेही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. जिल्हा प्रवेशाची कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे.