सारीचा सुळसुळाट ः कोरोनाही कुटुंबच घ्यायला लागला कवेत

House-to-house surveys
House-to-house surveys
Updated on

टाकळी ढोकेश्वर : कोरोनापाठोपाठ "सारी' आजाराने औरंगाबाद जिल्ह्यात थैमान घातलेले असताना, नगर जिल्ह्यातही जवळपास 42 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्‍यात कोरोनासोबतच "सारी'च्या रुग्णांचाही आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. 

"व्हायरल' आणि "बॅक्‍टेरिअल इन्फेक्‍शन' हे "सारी'चे मूळ आहे. पारनेर तालुक्‍यात "सारी'चे सर्वेक्षण सुरू असून, असे रुग्ण आढळल्यास त्यांची तातडीने तपासणी केली जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सर्वेक्षण सुरू आहे. नगर जिल्ह्यात सर्व तालुक्‍यांमध्ये "सारी'चे रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. पारनेर तालुक्‍यात गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरू आहे. 

कोरोना व "सारी'ची लक्षणे जवळपास सारखीच असल्याने, रुग्ण आढळल्यास त्यांची कोरोना तपासणी केली जाईल. कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठीही "सारी'च्या सर्वेक्षणाची मदत होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे मत आहे. 

सर्दी, खोकला, ताप, घशात खवखवणे, दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, ही सारी आजाराची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळून आल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. समोर येऊन रुग्णांनी त्याची माहिती द्यावी. त्यामुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकतो, असे आरोग्य अधिकारी डॉ. लाळगे यांनी सांगितले. पर्कात आल्याने क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या एका डॉक्टरला आज नगर येथे क्वॉरंटाईन करण्यासाठी हलविण्यात आले. त्यामुळे शहरात अनेक तर्कवितर्क केले जात होते. 

नेवासे येथील एका तरुणास येथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला नगरला हलविण्यात आले होते. त्यानंतर तो तरूण कोरोना बाधित असल्याचे अहवालावरुन पुढे आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या शहरातील दोघा डॉक्टरांसह आठ जणांच्या स्रावचे नमुने तपासण्यात आले होते. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. अहवाल निगेटिव्ह असतानाही त्यांना शहरातच क्वाॅरंटाईन करण्यात आले होते. मात्र क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या यातील एका डॉक्टरला आज सकाळी नगर येथे क्वॉरंटाईन करण्यासाठी नेण्यात आले.

याची माहिती क्वाॅरंटाईन असलेल्या इतरांना तसेच रुग्णालयातील लोकांना समजल्याने डाॅक्टरला नगरला का हलविण्यात आले याची दिवसभर चर्चा होती. दरम्यान, डाॅक्टरांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना कुठलाही त्रास झालेला नाही, तो एक प्रशासकीय व्यवस्थेचा भाग असल्याचे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी स्पष्ट केले.

शहरासह तालुक्यात एकही नवीन कोरोनाचा संशयित रुग्ण नाही. नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

कोरोनाने जिल्हा परेशान झाला आहे. जामखेड तालुक्यातील एक कुटुंबच बाधित झाले आहे. आतापर्यंत ३१जणांना ही बाधा झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com