पुरोगामी विचारांचे हत्यारे  पश्‍चिम महाराष्ट्रातूनच कसे?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सांगली ः महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांना पश्‍चिम महाराष्ट्राने बळ दिले. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अलिकडे डॉ. पतंगराव कदम यांच्यापर्यंत साऱ्यांनी शिक्षणाचा प्रचार, प्रचार केला. पुरोगामी विचारांना साथ दिली. याच भागात पुरोगामी विचारांची हत्या करणारे लोक कसे वाढताहेत? सनातनी विचार येथे कसे रुजताहेत, अशी खंत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी आज येथे व्यक्त केली

सांगली ः महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांना पश्‍चिम महाराष्ट्राने बळ दिले. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अलिकडे डॉ. पतंगराव कदम यांच्यापर्यंत साऱ्यांनी शिक्षणाचा प्रचार, प्रचार केला. पुरोगामी विचारांना साथ दिली. याच भागात पुरोगामी विचारांची हत्या करणारे लोक कसे वाढताहेत? सनातनी विचार येथे कसे रुजताहेत, अशी खंत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी आज येथे व्यक्त केली. 

हे पण वाचा - वसंतदादांच्या वारसांना शरद पवारांचा सूचक टोला

मिरज येथे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील, विश्‍वजीत कदम आदी उपस्थित होते.

श्री. खर्गे म्हणाले, ""महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. इथे आधुनिक शिक्षणाची बिजे रुजली आहे. डॉ. आंबेडकरांनी सांगितले, विचार करा आणि मग आचरण करा. शिक्षण प्रसारातही हा भाग पुढे आहे, मात्र दुर्दैवाने सनातनी विचारांची येथे वाढ होते आहे. गौरी लंकेश, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांचे हत्यारे या भागातून येतात, हे कशाचे लक्षण आहे. याचा विचार झाला पाहिजे.''  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How can the killers of advanced thinking come from western Maharashtra?