दैव बलवत्तर : हुक्केरीत छतासह पाळण्यात झोपलेले बाळ हवेत उडाले अन्....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

शोभा कटअल यांच्या घरातील पाळण्यात बाळ झोपले होते. मात्र जोरदार वाऱ्यामुळे घराच्या छतासह पाळणा उडाल्याने सर्वजण घाबरून गेले.

हुक्केरी  (बेळगाव) : शहरात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस व वाऱ्याने थैमान घातले. त्यात काही घरांची कौले व छत उडून गेले. शोभा कटअल यांनी पाळण्यात झोपविलेले बाळही
घराच्या छतासह उडाले. मात्र दैव बलवत्तर असल्याने सुदैवाने ते बचावले.मंगळवारी रात्री जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील बेळगाव रस्त्याकडेला असलेल्या घरांना मोठा फटका बसला.

 पावसामुळे घरांचे नुकसान

शोभा कटअल यांच्या घरातील पाळण्यात बाळ झोपले होते. मात्र जोरदार वाऱ्यामुळे घराच्या छतासह पाळणा उडाल्याने सर्वजण घाबरून गेले. ते काही फूट वर जाऊन खाली पडले. पण सुदैवाने बाळाला काहीच इजा झाली नाही. त्यामुळे सर्वांना आनंद झाला.
शोभा कटअल यांच्या घराच्या परिसरातील हलाप्पा मरडी व बसवराज मरडी यांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लॉकडाउनमुळे महिन्यापासून काहीच काम नसल्याने सर्वजण घरी होते. रात्री अचानक जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने भरपाई देण्याची मागणी गंगाव्वा मरडी, शोभा कटअल हलाप्पा मरडी यांनी केली आहे. महसूल निरीक्षक एम. एस. उस्‍ताद यांनी आज 
घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांनी आपल्या व्यथा त्यांच्याजवळ मांडल्या. त्यांना भरपाई देण्याचे आश्वासन उस्ताद यांनी दिले.

हेही वाचा- रत्नागिरीत कोविड योद्धा पोलिस कर्मचार्‍यांच्या पाठिवर शाबासकीची थाप...

सुदैवानेच टळला अनर्थ!

बाळ छतासह उडाल्याने कुटुंबीय घाबरून गेले होते. मात्र जाऊन पाहताच ते सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बाळाला काही झाले असते तर कुटुंबावर मोठा आघात झाला असता. पण सुदैवानेच अनर्थ टळल्याने यातून 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hukkeri accident case in belgaum