esakal | शहरात आज कोरोना रुग्णांची शंभरी ! एकूण रुग्णसंख्येची तीन हजाराकडे तर मृतांची संख्या 287 
sakal

बोलून बातमी शोधा

0corona_498.jpg

ठळक बाबी... 

  • -शहरात शुक्रवारी (ता. 3) सापडले एकूण 102 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 
  • मृत्यू एकच; शहरातील मृतांची संख्या आता 263 झाली 
  • आज तीन महिलांनी केली कोरोनावर यशस्वी मात; आतापर्यंत एक हजार 384 रुग्ण गेले घरी 
  • संस्थात्मक विलगीकरणात आहेत 973 संशयित; आजअखेर शहरातील 369 संशयितांचे अहवाल प्रलंबित 
  • सद्यस्थितीत होम क्‍वारंटाईनमध्ये एक हजार 152 व्यक्‍ती 

शहरात आज कोरोना रुग्णांची शंभरी ! एकूण रुग्णसंख्येची तीन हजाराकडे तर मृतांची संख्या 287 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ग्रामीण भागात आज 61 रुग्ण सापडल्यानंतर आता शहरात 102 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. आता शहरातील रुग्णसंख्या दोन हजार 499 झाली असून दोन मृत्यूसह मृतांची संख्या 263 वर पोहचली आहे. दुसरीकडे आता शहरातील 369 संशयितांचे अहवाल प्रलंबित असल्याने सोलापुकरांची धाकधूक वाढली आहे. 

शहरात शुक्रवारी (ता. 3) कुचन नगर, कोंडा नगर (अक्‍कलकोट रोड), अशोक नगर, जयलक्ष्मी सोसायटी, कामाक्षी नगर (शेळगी), जनता शॉपिंग सेंटर (नवी पेठ), जवाहर नगर (जुना विडी घरकूल), रोटे अर्पाटमेंट (रेल्वे लाईन), राजवाडा संकूल (दाते गणपतीजवळ), यशोधरा हॉस्पिटल, बाबा कादरी मशिद (दक्षिण कसबा), दक्षिण कसबा (दत्ता चौक), साठे-पाटील वस्ती (देगाव नाका), देशमुख-पाटील वस्ती (देगाव), लोभा मास्तर चाळ, उमा नगरी (मुरारजी पेठ), स्वामी विवेकानंद नगर, एसआरपी कॅम्प, सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र. सहा, कुमठा कॉर्नर (हराळे वस्ती), शिवशाही कॉलनी (होटगी रोड), हब्बू वस्ती (जुना देगाव नाका), किसान नगर, मल्लिकार्जुन नगर, नितीन नगर, संगमेश्‍वर नगर (अक्‍कलकोट रोड), पश्‍चिम मंगळवार पेठ, न्यू संजय नगर, साई विहार सोसायटी (कुमठा नाका), चाटला साडी सेंटरजवळ (भवानी पेठ), अशोक नगर (विजयपूर रोड), दमाणी नगर, आकाशवाणी केंद्र एमआयडीसी, पूर्व मंगळवार पेठ, लक्ष्मी नगर, हत्तुरे वस्ती (हत्तुरे वस्ती), माजी सैनिक नगर (विजापूर नाका), समर्थ सोसायटी (सोरेगाव), लक्ष्मी बॅंक कॉलनी, गुरुदेव दत्त नगर (रेणुका नगराजवळ), भारतरत्न इंदिरा नगर (सत्तर फूट रोड), गजानन नगर, भिमाशंकर नगर (मजरेवाडी), न्यू बुधवार पेठ, कुमठे, देगाव (उत्तर सोलापूर), सात रस्ता, जवळकर वस्ती (जुना कारंबा रोड), शुक्रवार पेठ, राठी अर्पाटमेंट (दक्षिण कसबा), शाहीर वस्ती (भवानी पेठ), गवळी वस्ती (लक्ष्मी पेठ), निर्सग विहार, लोकमान्य नगर (होटगी रोड), मंगळवार बाजारजवळ, देसाई नगर, बाळीवेस, वरुण अर्पाटमेंट (सम्राट चौक), विश्राम नगर (होटगी नाका), उत्तर कसबा, क्रांती नगर, विडी घरकूल, सेटलमेंट कॉलनी क्र. दोन, न्यू पाच्छा पेठ, गुरुमाता अपार्टमेंट (साई विहार नगर), लक्ष्मी चाळ (डोणगाव रोड), काडादी चाळ, भद्रावती पेठ, जोडभावी पेठ, गवळी वस्ती, बेगम पेठ, हत्तुरे नगर, कृष्णा कॉलनी (सैफूल) याठिकाणी नव्या 102 रुग्णांची भर पडली. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये जुळे सोलापुरातील दत्त नगरातील 87 वर्षीय पुरुष आणि अत्तार नगरातील 70 वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. 

ठळक बाबी... 

  • -शहरात शुक्रवारी (ता. 3) सापडले एकूण 102 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 
  • मृत्यू एकच; शहरातील मृतांची संख्या आता 263 झाली 
  • आज तीन महिलांनी केली कोरोनावर यशस्वी मात; आतापर्यंत एक हजार 384 रुग्ण गेले घरी 
  • संस्थात्मक विलगीकरणात आहेत 973 संशयित; आजअखेर शहरातील 369 संशयितांचे अहवाल प्रलंबित 
  • सद्यस्थितीत होम क्‍वारंटाईनमध्ये एक हजार 152 व्यक्‍ती 
loading image