ग्रीन क्रॅकर्स विक्रीच्या शंभर फटाके स्टॉलना परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hundreds of crackers stalls selling green crackers allowed

महानगरपालिकेकडून यंदा तिन्ही शहरात फक्त ग्रीन क्रॅकर्स अर्थात पर्यावरणपूरक फटाके विक्रीच्या स्टॉलना परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जर कोणी रस्त्यावर किंवा दुकानांत फटाके विकल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. 

ग्रीन क्रॅकर्स विक्रीच्या शंभर फटाके स्टॉलना परवानगी

सांगली : महानगरपालिकेकडून यंदा तिन्ही शहरात फक्त ग्रीन क्रॅकर्स अर्थात पर्यावरणपूरक फटाके विक्रीच्या स्टॉलना परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जर कोणी रस्त्यावर किंवा दुकानांत फटाके विकल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. 

यंदा दिवाळीसाठी तहसीलदार कार्यालयाकडून परवानगी प्राप्त 100 परवानाधारक ग्रीन क्रॅकर्स विक्रीसाठी स्टॉल धारकांनी महापालिकेकडे जागा मिळण्यासाठी अर्ज केला होता. सांगलीतील आरवाडे हायस्कुलच्या क्रीडांगणावर 20, तरुण भारत स्टेडियममध्ये 12, मिरज हायस्कुलमध्ये 20, कल्पद्रूम क्रीडांगणात 40 आणि कुपवाड रोहिदास चौकात 8 ग्रीन क्रॅकर्स स्टॉलना जागा उपलब्ध करून दिली आहे. या सर्व ग्रीन क्रॅकर्स विक्री स्टॉलच्या ठिकाणी आवश्‍यक अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्याबाबत सर्व स्टॉलधारकांना लेखी सूचना दिल्यात. 

फटाक्‍याबाबत न्यायालय, शासनाने ठरवून दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत लेखी नोटिस दिली आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणीच ग्रीन क्रॅकर्सची विक्री करता येणार आहे. जर सार्वजनिक रस्त्यावर किंवा कोणत्याही खासगी जागेत, दुकान गाळ्यात विना परवाना फटाके विकताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांना सूचना दिल्यात.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image
go to top