धक्कादायक! मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेला बाळासह घरातून हाकललं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Miraj Crime New

सरकार बेटी बचाओ, बेटी पढ़ाओसाठी प्रयत्न करत असताना मिरजेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

धक्कादायक! मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेला बाळासह घरातून हाकललं

मिरज : सरकार विविध माध्यमातून बेटी बचाओ, बेटी पढ़ाओसाठी (Beti Bachao Beti Padhao) प्रयत्न करत असताना मिरजेत (Miraj) एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलगी जन्माला आल्याने तिचा सांभाळ करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेला नवजात बाळासह घरातून हाकलून दिलंय.

याबाबत शाहिन अरिफ जमखानवाले (वय-२२, रा. माळी गल्ली, मिरज) या विवाहितेनं शहर पोलिसात पती, सासू, सासरा व नणंदेविरुद्ध फिर्याद दिलीय. पोलिसांनी (Police) पती अरिफ नजीर अहमद जमखानवाले, सासरा नजीर अहमद बशीर जमखानवाले, सासू नसरीन मोहसीन मिरजकर (तिघे रा. माळी गल्ली, मिरज) व नणंद यासिन मुस्ताक कसबा (रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

शाहिन जमखानवाले यांचा अरिफ या दोघांचाही दुसरा विवाह झाला होता. अरिफ यास पहिल्या पत्नीच्या दोन मुली आहेत. शाहिनकडून सासरच्यांना मुलगा हवा होता. शाहिनला मुलगाच झाला पाहिजे, म्हणून दबाव आणून दमदाटी, शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. मात्र, पुन्हा मुलगी झाल्याने सासरच्यांनी रुग्णालयात येऊन शाहिनला शिवीगाळ केली आणि बाळंतपणानंतर शाहिन मुलीला घेऊन घरी आल्यानंतर तिला घरातून हाकलून दिलंय.

Web Title: Husband Kicked The Wife Out Of The House With The Baby After Giving Birth To Daughter Miraj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime Newsmiraj
go to top