#IWillVote मतदार जागृतीसाठी कोल्हापुरात साकारली मानवी रांगोळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

मानवी रांगोळीचा उपक्रम देशातील एक उल्लेखनिय उपक्रम असून प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे. हा संदेश खऱ्या अर्थाने मतदारापर्यंत पोहोचेल. गेल्या निवडणूक 72 टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात ही टक्केवारी निश्चितपणे वाढेल. 

- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

कोल्हापूर - शहरातील विविध शाळामधील साडेसहा हजारावर विद्यार्थी - विद्यार्थींनीनी आज गांधी मैदानावर मतदान जागृतीची मानवी रांगोळी साकारली. ‘देश का महात्यौहार - 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली. 

जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, रविकांत अडसूळ, महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक धनंजय आंधळे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील उपस्थित होते. 

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार जागृती मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा या उद्देशाने आज शहरातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थींनीनी मानवी रांगोळीने कोल्हापूरकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.

मानवी रांगोळीचा उपक्रम देशातील एक उल्लेखनिय उपक्रम असून प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे. हा संदेश खऱ्या अर्थाने मतदारापर्यंत पोहोचेल. गेल्या निवडणूक 72 टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात ही टक्केवारी निश्चितपणे वाढेल. 

- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

आजच्या मानवी रांगोळीमध्ये शहरातील 6 हजार 500 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी झाले होते. नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले.

मानवी रांगोळी साकारण्यासाठी या उपक्रमामध्ये पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एम. एल. जी. हायस्कूल, इंदूमती देवी हायस्कूल, मनपा पी. बी. साळुंखे विद्यालय, एस. एम. लोहीया हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका स्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, नूतन आदर्श विद्यालय, मनपा नेहरुनगर विद्यामंदिर, मनपा वीर कक्कय विद्यालय, कोल्हापूर इंग्लिश स्कूल, विकास विद्यामंदिर, मनपा राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Will Vote Human Rangoli for Public awareness