आदर्श गाव हिवरेबाजार दरवर्षीच इतके दिवस राहणार "लॉक डाऊन'...का?

दत्ता इंगळे
सोमवार, 6 एप्रिल 2020

आदर्श गाव हिवरे बाजारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अर्थातच या निर्णयाला ग्रामसभेची मंजुरी घेतली जाईल, असं राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितलं. त्यांना नुकताच पद्मश्री बहुमान मिळाला आहे.

नगर तालुका : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात "लॉक डाऊन' करण्यात आल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, त्यातूनही आपणास खूप काही शिकता आले. देशात गेल्या 15 दिवसांत वातावरणात आणि हवामानात आमूलाग्र बदल झाला. इतर काही बाबतींतही सकारात्मक बदल झाला. सातत्याने कामाच्या मागे धावण्याच्या नादात नात्यांमधील ओलावा पार आटून गेला होता. कोरोनाच्या आपत्तीने माणसाला सिंहावलोकन करायला लावले हेही तितकेच खरे.

या पार्श्वभूमीवर आदर्श गाव हिवरे बाजारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अर्थातच या निर्णयाला ग्रामसभेची मंजुरी घेतली जाईल, असं राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितलं. त्यांना नुकताच पद्मश्री बहुमान मिळाला आहे.

हेही वाचा - कोरोना संशयितांची सिव्हिलमध्ये भाईगिरी, नर्स, डॉक्टरांना त्रास

पवार म्हणाले, ""प्रत्येक जण जिवाची काळजी न करता सातत्याने पळतच असतो. कोरोनामुळे सक्तीची विश्रांती मिळाली आणि त्याने शरीराला विश्रांतीचीही गरज असल्याचे जाणवले. कुटुंबाला कधीही वेळ न देणारा माणूस आज कुटुंबात रमला आहे. स्वच्छ हवा आणि ऑक्‍सिजनचे महत्त्व या "लॉक डाऊन'च्या काळात निसर्गाने आपणास पटवून दिले आहे. त्यामुळे यापुढे दर वर्षी 10 दिवसांचा "राष्ट्रीय लॉक डाऊन सप्ताह' जाहीर केल्यास निसर्ग व विज्ञानाचा समतोल राखण्यास मदत होईल.'' 

""हिवरे बाजार येथे वर्षभरात परदेशी, परराज्यांतील असंख्य लोक भेट देत असतात. यापुढे दर वर्षी ग्रामसभेत या 10 दिवसांच्या "लॉक डाऊन'चे नियोजन करणार आहोत,'' असे पोपटराव पवार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ideal village Hivarebazar will remain locked down for ten days every year