धक्कादायक ः कोरोना संशयितांची सिव्हिलमध्ये भाईगिरी, नर्स, डॉक्टरांना त्रास 

CORONA SUSPECTED PATIENT
CORONA SUSPECTED PATIENT

नगर : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना संशयित रूग्णांची तेथेही मनमानी सुरू आहे. एवढेच नव्हे तर ते उपचार करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी अधिसेविका यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते. ही बाब सिव्हील सर्जन यांच्या कानावर घातली जाणार आहे. या भाईगिरीला कंटाळून महिलांनी जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्त वाढवावा. तसे होणार नसेल तर काम कसे करायचं, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे. 

कोरोना पेशंटवर उपचार करणारे डॉक्टर व नर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून उपचार करीत आहेत. दुसऱ्याच्या जीवाची पर्वा करीत असतानाही कोरोनाचे संशियतांना त्याचे काही देणेघेणे नाही. ते उपचार घेत असतानाही गल्लीत वावरल्यासारखे वागतात. नर्ससोबत किरकोळ कारणावरून हुज्जत घालतात. त्यांच्या सुरेक्षेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नाही. त्यांच्या या मनमानीला सिव्हीलमधील नर्स वैतागल्या आहेत.

कोरानाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयात दोन वार्ड करण्यात आले आहेत. त्या वार्डमध्ये कोरोना संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, उपचार करत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना पेशंट त्रास देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे महिला कर्मचारी वारंवार त्यांना सांगतात की एकत्र येऊन नका, तरीही ते रुग्ण एकत नाहीत.

अनेक रुग्णांना जेवणाचा डबा घडून येतो. त्याचा ते गैरफायदा घेतात. महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केल्यास ते अरेरावीची भाषा वापरतात. याबाबत महिला कर्मचाऱ्यांना त्या रुग्णांनी अधिसेविकांकडे तक्रार केली आहे. रुग्णांच्या अशा वागण्यामुळे रुग्णायात पोलिस बंदोबस्त वाढवा, अशी मागणी रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून होऊ लागली आहे. 

पोलिस कर्मचारी संशयित 
मुकुंदनगरमध्ये राहत असलेले एक पोलिस कर्मचारी आठ दिवस सुटीवर होते. मात्र, त्याच काळात मुकुंदनगरमध्ये परदेशी नागरिक राहिले. त्यानंतर मुकुंदनगरमधील काही लोक कोरोनाबाधीत झाले. त्यामुळे त्या पोलिस कर्मचाऱ्यालाही विलगीकरण कक्षात ठेवून त्याचे स्त्रवाचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजली. 

अन्यथा उपचाराला कोण धजावणार नाही

जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय स्टाफ विपरित परिस्थितीत काम करीत आहे. त्यांचे मनोबल उंचावण्याची गरज आहे. हा स्टाफ घरी गेल्यानंतर ते कुटुंबाच्याही संपर्कात येत नाहीत. उपचार करताना ते काळजी घेत असले तरी रोज येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे त्यांच्या नातेवाईकांना भीती वाटते. सिव्हील किंवा बूथ हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे मनोधैर्य चांगले ठेवण्याचे काम करावे लागेल. काही रूग्णांकडून गैरवर्तन होत आहे. त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांची मानसिकता नकारात्मक होईल, सध्यस्थितीत तसे होणे हिताचे नाही. कारण बदली कर्मचारी त्या पेशंटवर उपचार करण्यास धजावणार नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. या प्रकरणाकडे नक्कीच गंभीरपणे पाहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com