
मिरज : शहरातील दिंडीवेस, मालगाव रस्ता परिसरात बेकायदा सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी एका रिक्षासह सहा सिलिंडर असा एक लाख ३६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनेश अशोक टाकवडे (वय ३४, पाटील गल्ली, मिरज), संजय बाबासाहेब शेळके (वय ३८, दुर्गामाता कॉलनी, मिरज) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.