

Police Seize Illegal Gutkha Stock
sakal
मिरज : बेडग (ता. मिरज) जवळ शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा सहा लाख ९६ हजार ९६० रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. मालाची वाहतूक करणारा सहा लाख ५० हजार रुपयांचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले.