esakal | Wildlife Organs : विट्यात बेकायदेशीर वन्यप्राण्याचे अवयव सापडले; एकास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

wildlife organs

विट्यात बेकायदेशीर वन्यप्राण्याचे अवयव सापडले; एकास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विटा - येथे राहत्या घरी हात्ता जोडी (वन्यप्राणी घोरपडीचे अवयव ) एक, इंद्रजाल एक व साठ मोरपिसे बेकायदेशीर बाळगल्या प्रकरणी वनविभागाने एकाला ताब्यात घेऊन अटक केली. शिवाजी दाजी शिंदे ( वय ७१, शिवशक्ती प्लाझा, प्लॅट नं. ५, दुसरा मजला, कदमवाडा, विटा ) असे त्याचे नाव आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांनी सांगितले. त्यांच्याकडे वरील प्राण्याचे अवयव असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार आज दुपारी तीनच्या सुमारास शिंदे यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता वरील साहित्य आढळून आले.

वन्यजीव अधिनियम १९७२ चे उल्लघंन शिंदे यांनी केले असून त्यांच्याकडील वरील साहित्य जप्त करण्यात आले. उपवनसंरक्षक, (प्रादेशिक), विजय माने ( सांगली ) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ.अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, रोहन भाटे वनक्षेत्रपाल अरविंद कांबळे, महेशकुमार आंबी,अशोक चव्हाण, आर. पी. दरेकर, श्रीमती.एम. के. धोत्रे, अ. द. कांबळे,एस. एस. खिल्लारी, गणेश करांडे यांनी ही कारवाई केली.

loading image
go to top