"बाबासाहेब संवादी आहेत आणि संघर्षवादी आहेत. बुद्ध कोणालाच शरण जात नाही आणि शरण जा, म्हणून सांगत नाही, म्हणूनच ते बुद्धाच्या वाटेने गेले."
सांगली : ‘‘नवा आक्रमक हिंदुत्ववाद सध्या आला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी नव्या आंबेडकरवादाचाही विकास झाला पाहिजे. त्यासाठी सर्व धर्मांतील विधायक प्रवृत्ती एकत्र केली पाहिजे. नवीन काळाची आव्हाने पेलताना, या नवीन तत्त्वज्ञानाचा विकास करण्याची गरज आहे. माणसामधील असलेल्या गुणांची बेरीज करावी, हीच नव्या आंबेडकरवादाची कल्पना आहे,’’ असे प्रतिपादन दीपस्तंभ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (Dr. Shripal Sabnis) यांनी केले.