सांगली : ‘म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या (Mhaisal, Tembhu Irrigation Scheme) विस्तारित कामाचा ठेका शंभर टक्के दराने काढला जातो, हे संशयास्पद आहे. केंद्राची रस्त्याची कामे ४६ टक्के बिलो दराने होत असताना ‘पाटबंधारे’तील ठेक्यांत स्पर्धा का नाही? हा पैसा कुठे जातोय,’ असा संशय व्यक्त करत खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.