"संविधानामुळे अनेक सुख, सुविधा सर्वांना मिळाल्या आहेत. त्यामुळे संविधान लिहिणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे प्रत्येकाने नित्य स्मरण करावे."
निपाणी : साधू, संत, महापुरुष व महात्म्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या विचारधारा दिल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने समाज अधोगतीकडे जात आहे. भेसळयुक्त पदार्थ आणि निसर्गाचे संवर्धन होत नसल्याने अनेक व्याधी जडत आहेत. महापुरुषांनी घालून दिलेल्या शिकवणी, आचरणात आणून त्यांच्या स्वप्नातील देश घडविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील (Bhaskarrao Pere-Patil) यांनी केले.