सांगलीतील ते ठसे बिबट्याचे नव्हे कुत्र्याचे

Dog
Dog

सांगली : विश्रामबाग येथील गव्हर्मेंट कॉलनीत दिसलेला प्राणी हा बिबट्या होता का ? याविषयी कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. संबंधित ठिकाणी बिबट्याचे ठसे म्हणून दाखवण्यात आलेला छाप बिबट्याच्या नव्हे तर कुत्र्याच्या पायाच्या ठशांसारखा आहे, असे मत तज्ज्ञांनी "सकाळ' शी बोलताना नोंदवले. या भागात नागरिकांत मात्र भिती, चिंतेचे वातावरण कायम आहे. 

गव्हर्न्मेंट कॉलनीतील स्थानिक नागरिक राजेंद्र पोळ यांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला. तो जेथे पाहिला तेथे पायाचा ठसा आढळला. त्याची छायाचित्रे तज्ज्ञांना दाखवून "सकाळ' ने तो बिबट्या असावा का ? या भागातपर्यंत बिबट्या येईल, असा मार्ग आहे का ? असे प्रश्‍न उपस्थित करून खातरजमा करून घेतला. ठशांबाबत तज्ज्ञांनी खात्रीने हे कुत्र्याच्या पायाचे ठसे असावेत, असे सांगितले. राहिला श्री. पोळ यांच्या दाव्याचा विषय तर मानद वन्यजीव रक्षक पापा पाटील यांनी ते इजाट असू शक ते, अशी शक्‍यता वर्तवली. प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या प्राण्याच्या उंचीवरही मतमतांतरे आहेत. कारण, पोक्त बिबट्याची उंची 60 ते 70 सेंटीमीटर एवढी असते. या भागात अनेक कुत्री आहेत, भटकी कुत्री तर शेकडो. बिबट्या आला असता तर कुत्र्यांनी भुंकून दंगा घातला असता. असे घडले नाही, असे स्थानिक सांगतात. "मी ठसे पाहिलेत, ते मोठ्या कुत्र्याचेच आहेत', असे ठाम मत प्राणी मित्र अमोल जाधव यांनी "सकाळ' शी बोलताना नोंदवले. 

बिबट्या येण्याचा मार्ग आहे, पण... 
विश्रामबाग गव्हर्मेंट कॉलनीत बिबट्या आकाशातून पडला काय, अशी सहज विचारणा होते आहे. वास्तविक, बिबट्याला या भागात येण्याचा जवळचा मार्ग आहे. दानोळी (ता. शिरोळ) पट्ट्यात अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने बिबट्याचे दर्शन झाले. तेथून नदीकाठावरून उदगाव हद्दीतून कृष्णा नदीच्या पुलावरून तो इकडे येऊ शकतो. अर्थात, हा केवळ नकाशा आहे, वास्तव अंधारात गडप झाले आहे. 

"छायाचित्रातील ठसे निटसे दिसत नसले तरी ते बिबट्याचे असावेत, असे वाटत नाही. त्याला काही ठिकाणी असे नखाचे कोर दिसताहेत. नख उमटले तर तो प्राणी मांजरवर्गीय असत नाही. प्रथमदर्शीी हे ठसे कुत्र्याच्या पायाच्या ठशासारखे भासतात. प्रत्यक्ष पाहून अधिक खात्री करता येईल.'' 
- विनिता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र (राखीव) 

"विश्रामबाग परिसरात दिसलेल्या प्राण्याचे वर्णन आणि ठसे पाहता तो बिबट्या नव्हता, हे खात्रीने सांगता येईल. फार तर फार ते पट्टेरी इजट असावे. ठशांवरून अंदाज बांधायचा झाल्यास ते कुत्र्याच्या पायाचे ठसे आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.'' 
- अजित उर्फ पापा पाटील, मानद वन्यजीव रक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com