
कडेगाव : कडेपूर (ता. कडेगाव) येथे दोघा अनोळखी चोरट्यांनी भरदिवसा शेतात काम करणाऱ्या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ८२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ११.५४ च्या सुमारास घडली. ऊर्मिला भगवान कांबळे (कडेपूर) यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या जबरी चोरीच्या घटनेने कडेपूर, कडेगाव परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.