
सांगली : येथील अपंग सेवा केंद्रातील अडीच हजार मुलांना रोजगार मिळाला आहे. केंद्रामध्ये अठरा वर्षांपुढील मुलांना शिक्षण दिले जाते. दिव्यांगांनाही समाजात स्वाभिमानाने जगता यावे, या उद्देशाने मुलांना सक्षमीकरणाचे धडे दिले जातात. केंद्रामध्ये सध्या साडेपाच हजारांहून अधिक मुलांना शिक्षण दिले जात आहे. यांतील काही मुले आज शासकीय उच्च पदावर काम करत आहेत, हेच या केंद्राचे यश आहे.