
Sangli Student Harrashment : आटपाडी तालुक्यातील एका गावात येथे अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. चार तरुणांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतल्याचे मंगळवारी पोलिस तपासात उघड झाले आहे. संशयितांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचीही नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे.