esakal | सांगली जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष, सभापतिपदच चुरशीचे
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

सांगली जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष, सभापतिपदच चुरशीचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाला प्रदेश भाजपकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतिपदासाठीची शर्यत खुली झाली आहे. आरग गटातील सदस्या सरिता कोरबू यांना नेत्यांनी आधीच शब्द दिला असल्याने त्यांचा अध्यक्षपदावर मजबूत दावा आहे. पलूस येथील अश्‍विनी पाटील, ॲड. शांता कनुंजे याही दावा करण्याची शक्यता आहे. उपाध्यक्ष आणि सभापतिपदासाठी मात्र शर्यत रंगणार आहे. बदलाच्या या निर्णयामुळे काही प्रमुख नेते नाराज असल्याने त्यांची भूमिका काय असेल, याकडे लक्ष असेल.

प्राजक्ता कोरे यांना अध्यक्षपद देताना सरिता कोरबू प्रमुख स्पर्धक होत्या. तेव्हा त्यांची समजूत घातली होती. सव्वा वर्षानंतर संधी देण्याचा शब्द त्यांना दिला आहे. मात्र महापालिकेत महापौर निवडीत फटका बसल्याने भाजप सावध झाली आणि जिल्हा परिषदेतील बदल लांबणीवर पडला. तो टळला, असे वाटत असतानाच आता बदलाचे आदेश आले आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांना अवघे चार महिने मिळणार आहेत. आचारसंहितेचा काळही त्यातच असेल. त्यामुळे हे पद विकास कामापेक्षा राजकीय महत्त्‍वाकांक्षा आणि दिलेला शब्द पुरा करण्याचा प्रयत्न करणे, या अर्थाने महत्त्‍वाचे ठरले आहे.

हेही वाचा: अविनाश भोसले, विनोद गोयंका, विकास ओबेरॉय यांच्यासह चौदाजणांवर गुन्हा

भाजपमध्ये उद्‍भवलेली संभाव्य बंडाळी शमवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी बदलाला मान्यता दिल्याची चर्चा आहे. या घडामोडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना ही महाविकास आघाडी येथे काय भूमिका घेते, हे महत्त्‍वाचे असेल. अवघ्या चार महिन्यांसाठी राजकीय कौशल्य वापरण्याची शक्यता कमी असून, सदस्यही या बदलात आडवा पाय घालण्याच्या मानसिकतेत नाहीत, असे दोन्ही गटांकडून खासगीत सांगितले जात आहे.

चार सभापती ठरणार कसे?

भाजपच्या सत्तेला शिवसेना, घोरपडे समर्थक, रयत आघाडी, स्वाभिमानीचा टेकू आहे. राज्यात सत्तांतरानंतर आणि येथे तीन वर्षांनंतर बदल करताना शिवसेनेने पद घेतले नाही, मात्र विरोधही केला नाही. घोरपडे गट, रयतकडे महत्त्‍वाची खाती आहेत. आता बदल करताना बिनविरोधसाठी भाजपचा प्रयत्न राहील. तरीही, समर्थक पक्ष, गटांना सोबत घेऊन सभापतिपद दिले जाणार का? रयत आघाडी भाजपचाच भाग झाली आहे, मात्र आमदार अनिल बाबर, अजितराव घोरपडे शिवसेनेत आहेत, त्यांना भाजपसोबत सत्तेत जाणे सोयीस्कर ठरेल का, हा कळीचा मुद्दा असेल. सभापतिपदासाठी अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर, मनोज मुंडगनूर, रेश्‍मा साळुंखे, वंदना गायकवाड, मोहन रणदिवे, स्नेहलता जाधव, रेखा बागेळी, मंगल नामद यांच्यासह रयतचे निजाम मुलाणी, सुरेखा जाधव; घोरपडे समर्थक संगीता पाटील याही दावा करतील.

हेही वाचा: शिवलीला ताई, तुम्ही बिग बॉसमध्ये जायला नको होतं; समर्थक नाराज

कुणाचे ‘काका’ उपाध्यक्ष होणार?

पदाधिकारी बदलाचे सूत्रधार खासदार संजय पाटील आहेत. त्यांचे काका डी. के. पाटील यांचे नाव अर्थातच उपाध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने चर्चेत राहू शकेल. त्याचवेळी शिराळ्याचे नेते सत्यजित देशमुख यांनी कोणतेही महत्त्‍वाचे पद न घेता काँग्रेसमधून भाजप प्रवेश केला. त्यांचे काका संपतराव देशमुख यांच्यासाठी ते उपाध्यक्षपद मागू शकतात. त्यामुळे कुणाचे ‘काका’ उपाध्यक्ष होणार, याकडे लक्ष असेल.

loading image
go to top