Video : 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात कोल्हापुरात ग्रंथदिंडी सोहळा...

Inauguration of All India Marathi Sant Sahitya Sammelan in kolhapur marathi news
Inauguration of All India Marathi Sant Sahitya Sammelan in kolhapur marathi news
Updated on

कोल्हापूर - "ज्ञानोबा माऊली तुकारामऽऽऽ', "निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामऽऽऽ' अशा अखंड गजरात आज सकाळी अंबाबाई मंदिरातून भव्य ग्रंथ दिंडी सोहळा सजला. वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित येथील आठव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने झालेल्या या सोहळ्यात हजारो वारकरी तल्लीन झाले. दरम्यान, चाळीसहून अधिक लहान-मोठ्या ग्रंथ दिंड्यांचा या सोहळ्यात समावेश होता. 
सकाळी आठच्या सुमारास अंबाबाई मंदिरातून महापौर ऍड. सूरमंजिरी लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला. महापौर ऍड. लाटकर या उत्स्फूर्तपणे दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, शिवाजीराव पाटील, एम. पी. पाटील, भानुदास यादव, नंदकुमार मराठे आदी उपस्थित होते.

चाळीसहून अधिक दिंड्यांचा सहभाग 

बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर मार्गे दिंड्या गांधी मैदान येथे आल्या. सोहळ्यात रिंगणाबरोबरच विविध फुगडीसह पारंपरिक खेळही रंगले. शाळकरी मुलांच्या लेझीम व ढोलपथकांनीही सोहळ्याची उंची वाढवली. 
ग्रंथदिंडीनंतर गांधी मैदानात उभारलेल्या भव्य मंडपात मुख्य उद्‌घाटन सोहळा झाला. त्यानंतर दुपारच्या सत्रात विविध विषयांवर परिसंवाद झाले. "प्रशासनात संत साहित्याची गरज' या विषयावर झालेल्या परिसंवादात चैतन्यमहाराज कबीर, बाबामहाराज वाघमारे, विठ्ठल पाटील यांचा सहभाग होता तर "संत साहित्याची निर्मिती का व गरज' या विषयावरील परिसंवादात डॉ. रणधीर शिंदे, डॉ. बी. एन. तुरंबेकर, अरूण नाईक, जयसिंग कुंभार यांचा सहभाग होता. सायंकाळनंतर सामुदायिक हरिपाठ, महादेवबुवा शहाबाजकर यांचे भजन, प्रभाकरमहाराज बोधले यांचे किर्तन आणि लक्ष्मणमहाराज राजगुरू यांचे भारूड रंगले. 

दिंड्यांची स्पर्धाही 

सोहळ्याच्या निमित्ताने स्पर्धा झाली. सोहळा मार्गावर दिंड्यांचे परी झाले. दिंडीतील वारकऱ्यांच्या पायाचा ठेका, ड्रेसकोड, गाथेतील अभंग, वाद्यांचा मेळ आदी निकषावर दिंड्यांना सोमवारी (ता. 30) होणाऱ्या सांगता सोहळ्यात पारितोषिके दिली जाणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com