
Sangli Children Drowned : जाडरबोबलाद (ता. जत) येथे खेळताना घराच्या बांधकामासाठी खणलेल्या पाण्याच्या खड्ड्यात बुडून चौदा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर सुदैवाने एकाचा जीव वाचला आहे. श्रवण महेश चनगोंड (वय १ वर्ष ४ महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव असून, करण महेश चनगोंड (वय २ वर्षे ५ महिने, दोघेही जाडरबोबलाद, ता. जत) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.