Social Media Fraud : सोशल मीडियावर फसवणूकीची प्रकरणे वाढत आहेत, सामान्य माणसाने खबरदारी घ्यावी

ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या बदल्यात आर्थिक फसवेगिरी करून गंडा घालण्याचे प्रकार वाढत आहेत.
Social Media
Social Mediasakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड - सोशल मीडियावर जुन्या दुर्मिळ नोटा यामध्ये ७८६ क्रमांकाची तसेच पाच रुपयाची जुनी नोट आणि जुन्या चलनी नाण्यांच्या बदल्यात लाखो रूपये देण्याचे आमिष दाखवून लुबाडण्याचे आणि ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या बदल्यात आर्थिक फसवेगिरी करून गंडा घालण्याचे प्रकार वाढत आहेत. सामान्य माणूस पैशाच्या आशेने त्यात अडकत चालला असल्याचे चित्र आहे.

या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सामान्य माणसाने सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यासाठी सोशल मीडियावर अज्ञात लोकांपासून सावध राहणे, कोणतीही ऑनलाइन कर्ज किंवा गुंतवणूकीची संधी तपासणे आणि त्याच्या वैधतेची पुष्टी करणे हे खबरदारीचे उपाय आहेत.

आपले बँक खाते आणि क्रेडिट कार्ड माहिती कोणाबरोबरही सामायिक करू नका, आपल्याला संशयास्पद ईमेल किंवा संदेश मिळाल्यास तो त्वरित हटवण्याची काळजी घेणे हे फसवणुकीपासून वाचण्याचे पर्यायी मार्ग आहेत.

फसवणूकीच्या घटनांमध्ये, आरोपींना कलम ४२० (फसवणूक), कलम ४०६ (विश्वासघात) आणि कलम ३४ (सर्वसाधारण उद्देशाने अनेक व्यक्तींनी केलेली गुन्हेगारी) अंतर्गत अटक केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त सायबर गुन्ह्यांसाठी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कारवाई देखील केली जाऊ शकते.

याबाबत पोलिस आणि सायबर सेल सातत्याने लोकांना सोशल मीडियावर अज्ञात लोकांशी सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद कारवायांची त्वरित नोंद करण्याचे आवाहन करीत असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com