सांगली : समडोळीत गव्याचे दर्शन; परिसरात सतर्कतेचा इशारा | Indian Bison | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Bison

सांगली : समडोळीत गव्याचे दर्शन; परिसरात सतर्कतेचा इशारा

सांगली - येथील समडोळी (ता. मिरज) येथील एका शेतात काल रात्री उशीरा गव्याचे दर्शन झाले. त्यानंतर वनविभागास तातडीने कळविण्यात आले. वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र रात्रीत तो गवा निघून गेला असण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, आज सकाळी आणि सायंकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, त्याचा पायांचे ठसे मिळून आले. समडोळीसह पंचक्रोषीत सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.

हेही वाचा: संपात सहभागी न झाल्याने BJP जिल्हाध्यक्षाची विभाग नियंत्रकाला दमदाटी!

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात गव्यांचे दर्शन होत असते. काही दिवसांपुर्वी सांगली शहरातील गव्हर्मेंट कॉलनीत गवा दिसून आला. शहरात गवा दिसून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर रात्रभर शोध मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर तो गवा कोल्हापूरच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर काल समडोळी परिसरातील एका शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या नागरिकास गवा असल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने वनविभागास कळविण्यात आले. सहायक वनसंरक्षक अजित सादणे, वनपाल तुषार भोरे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गवा दिसून आला नाही. आज सकाळपासूनही गव्याचा शोध घेण्यात आला. मात्र, पायांचे ठसे दिसून आले. परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

loading image
go to top