इंदोरीकर म्हणतात, लोकच ग्रंथाला प्रमाण मानत नसतील तर काय करणार

Indorikar says, people do not believe in religious texts
Indorikar says, people do not believe in religious texts

नगर तालुका ः निसर्ग नियमानुसार अनेक बाबी सत्य व निश्‍चित आहेत. पण ज्या लोकांचा देवावर आणि ग्रंथावर विश्वास नाही. त्यांना हे अमान्य आहे .पण त्याला कोण काय करणार,  असे मत सध्या राज्यभर चर्चेत असलेले निवृत्ती इंदोरीकर महाराज यांनी केले.

इंदोरीकर महाराजांनी पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या कथित विधानावरून महाराष्ट्रात सध्या वादळ उठले आहे. विशिष्ट तारखेला समागम केल्यास मुलगा व मुलगी होते, असे वक्तव्य केले होते. त्यावरून वाद उफाळला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती , भूमाता ब्रिगेडने महाराजांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. इंदोरीकर यांनी अगोदर आपण हे वाक्य ग्रंथांना प्रमाण मानून केले. त्यांचे अनुयायीही तो दाखल देत होते. परंतु पीसीपीएनडीटी कमिटीकडे महाराजांनी आपण तसे म्हणालोच नसल्याचा खुलासा केला होता. या कीर्तनातही ग्रंथांचाच पुन्हा दाखला दिला होता.

आठवड (ता. नगर) येथे किर्तनात बोलताना केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांच्या मातु:श्री स्व.सोनाबाई माणिकराव गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 


इंदोरीकर पुढे म्हणाले, तंदरूस्त जीवन जगवण्यासाठी हसणे महत्वाचे आहे. त्या साठीच आजपर्यंत 26 वर्ष कीर्तन सेवेच्या माध्यमातून जनतेला हसवत आलो. पण आज मला रडावे लागतंय, अशी खंत ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आताच्या वादावर बोट ठेवले.


यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, राहुल जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, जेष्ठ नेते बन्शीभाऊ म्हस्के, जिल्हा बैंकेचे माजी उपाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हापरिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराले, दत्ता नारळे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के, बाजार समितिचे आजी माजी संचालक यांच्यासह नगर तालुक्‍यातील विविध क्षोतील मान्यवर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com